school-patna 
देश

शाळेच्या पहिल्या दिवशी १८ लाख विद्यार्थ्यांची हजेरी;बिहारमध्ये नऊ महिन्याच्या खंडानंतर विद्यालये सुरू

उज्वलकुमार

पाटणा - लॉकडाउनमध्ये बंद असलेल्या बिहारमधील नऊ हजारपेक्षा जास्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा नऊ महिन्याच्या खंडानंतर सोमवारी पुन्हा सुरू झाल्या. शिक्षण विभागातील माहितीनुसार राज्यभरात १८ लाख विद्यार्थी आज शाळेत उपस्थित होते. खासगी शाळांमध्ये उपस्थिती कमी होती. 

कोरोनाच्या साथीमुळे लॉकडाउन जाहीर झाल्याने १४ मार्चपासून राज्यातील शाळा-महाविद्यालये व शिकवणी वर्ग बंद होते. नववी ते बारावी व शेवटच्या वर्षातील महाविद्यालयीन विद्यार्थी आज प्रत्यक्ष वर्गात उपस्थित होते. शाळा सुरू झाल्याने रस्त्यावर पूर्वीप्रमाणेच गजबजले होते. शाळेत कोरोनाचे सर्व नियम पाळून अनिवार्य असून निम्म्या क्षमतेने व सुरक्षित अंतर पाळून वर्ग सुरू करण्यात आले, अशी माहिती शिक्षण विभागाचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी दिली. खासगी शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती मात्र तुरळक होती. जोपर्यंत मुलांना लस दिली जात नाही, तोपर्यंत त्यांना शाळेत पाठविण्यास बहुतेक पालक तयार नाहीत. प्राथमिक व शिशू वर्गाची शाळा अद्याप सुरू झालेली नाही. 

दहावी- बारावीची पुढील महिन्यात परीक्षा 
बिहार शिक्षण मंडळाने दहावी व बारावीची परीक्षा पुढील महिन्यात होणार असल्याचे जाहीर केले आहे तर केंद्रीय मंडळाची दहावीची सराव परीक्षा मंगळवार (ता.५) पासून सुरू होणार आहे. यामुळे खासगी शाळांत उद्यापासून वातावरण परीक्षामय असेल. 

बिहारमधील विद्यार्थीसंख्या 
एकूण  - ३६,६१,९४२ 
विद्यार्थी - १८,५८,२३३ 
विद्यार्थिनी - १८,०३,७०९ 
पहिल्या दिवशी उपस्थिती  -  १८ लाख 


शाळा पुन्हा सुरू झाल्याने मी खूष आहे. सरकारी शाळांत शिकणाऱ्या अनेक मुलांकडे लॅपटॉप नसल्याने ऑनलाइन शिक्षणात अडथळे येतात. आमचा अभ्यासक्रम खूप मागे राहिला असून तो  पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. 
नववीतील विद्यार्थी, मिलर हायस्कूल, पाटण 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाण्यात मध्यरात्री तरुणांचा जीवघेणा थरार! भरधाव कारच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी, Viral Videoमुळे खळबळ

Sangli District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत पक्षीय राजकारण नको आमदार जयंत पाटील ; राज्यात दुष्काळ जाहीर करा

IPL 2027 News: खेळाडू की मार्गदर्शक? CSK ने MS Dhoni ची भूमिका जाहीर केली; मुख्य प्रशिक्षकपदी झहीर खान बसताच मोठी घोषणा

Marathi News Live Updates : छात्रों की गूंज' हा पुढील कार्यक्रम चेन्नईमध्ये

Konkan Railway Debt Repayment : रोहा-वीर दुहेरीकरण ते चिनाब ब्रिजची निर्मिती, कोकण रेल्वेचा 5 वर्षांत कायापालट; 23,500 कोटींचे नवीन प्रकल्प हाती

SCROLL FOR NEXT